अभियान सर् यांच्या बद्दल थोड़!
मूळचे नागपुर चे असलेले अभियान सर् यानी #मुम्बई मधून आपली इंजीनियरिंग ची डिग्री पूर्ण केली. नंतर समोरचे शिक्षण ##अमेरिका मधून केले, तिथे त्यांनी आपली पीएचडी मिळवली.
10 वर्ष #अमेरिका मधे काम केल्यानंतर भारतात येउन #बैंगलोर मधे एका नामवंत डिज़ाइन संस्थेमधे शिकवणे सुरु केले.
आपल्या युवा काळातच बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून समाजसाठी काम करण्यास सुरुवात केली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या समाजाचा विकास कसा करता येईल याचा विचार ते नहमी करत असत. अशातच त्यानी नालंदा लैब ची पायउभारणी केली. नव नवीन प्रकल्प आपल्या विदयार्थांना कस शिकवता येतील यासाठी आपल्या नौकरी वरुन 1 वर्षाची रजा घेतली व वर्धाला त्यांचे जवळचे मित्र अनूप कुमार सर् यांच्या सोबत काम करु लागले. आपल्याला असलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या युवांसाठी कसा करता येईल यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असत. अतिशय मन मिळाऊ स्वाभाचे अभियान सर् नेहमी समाजहितासाठी झटत असत. आपल्या युवकांना प्रोत्साहित करत असत. नालन्दा अकेडमी जी समाजातील गरजू विदयार्थांना उच्च शिक्षणाचे दरवाजे उघड़े करून देते , अशा नालंदा एकेडमी चे ते एक आधारस्तंभ होते. विज्ञान आणी तंत्रध्यानच्या माध्यमातून आपल्या समाजाचा विकास करण्याचे त्यांचे एक स्वप्न होते. अशे लोक लखातून एक असतात, जे विदेशातुन शिकूण आल्यावर, मोठ्या पगारची नौकरी वर एक वर्षाची रजा घेऊन फक्त समाजहितासाठी सर्व त्यागतात. अशा या थोर आणि ज्ञानी पुरुषाच निधन काल दिनांक 8 फरवरी ला हॄदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. एक महान तारा हरपला, ज्याची जगा कोणीही भरून काढू शकत नाही......
मीस यु अभियान सर

No comments:
Post a Comment